संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– युवा मंडळी गेली धुम्रपानाच्या आहारी
कामठी ता प्र 20 :- धूम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे.धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो आदी प्रकारच्या सूचना ठळक अक्षरात सिगारेटच्या पाकिटावर नमूद करूनही सिगारेट ओढण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे.विशेषता काही निव्वळ मजा म्हणून सिगारेट तोंडाला लावणारी युवा मंडळी कालांतराने या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
कामठी तालुक्यात दैनंदिन लाखों रुपयाच्या घरात सिगारेटचा धूर हवेत उडत असल्याचे मत एका जांनकराणी व्यक्त केले आहे.एक व्यसनी व्यक्ती दिवसातून जवळपास 20 सिगारेट तर नक्कीच ओढतो.अति धूम्रपानामुळे फुफ्फुसाचाच नव्हे तर नाक, तोंड, स्वरयंत्र , श्वासनलिका , पोट, मूत्रपिंड, मूत्राशय ,गर्भाशय, अस्थीमज्जा, व रक्त या अवयवांना कर्करोग होऊ शकतो. ओढण्याकरिता केवळ सिगारेट पेटवल्यापासून ती ओढून धूर तोंडाबाहेर काढेपर्यंत संपूर्ण शरीरावर या शस्त्रक्रियेचा दुष्परिणाम होत असतो. सिगारेट मध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतात त्यापैकी करसिनोजेनिक चे प्रमाण अधिक असून धुरासह या केमिकलमुळे अनियांत्रित प्रमाणात शरीरातील पेशीमध्ये परिवर्तन होऊन कर्करोग होतो असे तज्ञाकडून व्यक्त केल्या जात आहे.यासंदर्भात पुरेशी माहिती असूनही विशेषता नोकरीपेशा वयस्क, महाविद्यालयीन तरुण वर्ग, तसेच 30 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांच्या तोंडात सिगारेट आढळून येत असल्यावरून या बाबीला दुजोरा मिळत आहे.या प्रकाराला आळा बसने आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरजेचे ठरत आहे.
– खबरदार…सात वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा
-सार्वजनिक ठिकानी धूम्रपान करणे गुन्हा असल्याची बाब 2003 मध्ये केंद्र शासनाने तयार केलेल्या कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाहि करण्याचे अधिकार पोलिसांना असून सात वर्षापर्यंत दंडाची शिक्षा देखील होऊ शकते.
@ फाईल फोटो