फुले व फळात रमतेय सिनिअर मन्सुरा जहूर हसन

नागपूर :-निसर्गाचा समतोल राहावा म्हणून तसेच छंद आणि आवड असणारी सिनीअर मन्सुरा जहूर हसन यांनी कोराडी नजीकच्या बोखारा येथील निसर्ग रम्य परिसरात दहा एकर क्षेत्रात विविध फुले व फळांची झाडे लावली आहेत. ट्यूलिप हे काश्मीरचे फूल आहे आणि स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरची देणं आहे. पण आज आपल्या विदर्भात म्हणजे नागपुरात ट्यूलिपचे फुल आणि स्ट्रॉबेरी पाहायला मिळेल, अशी माहिती, मन्सुरा जुहूरा हसन यांनी दिली. त्यांच्या या फार्ममध्ये इनडोअर व आउटडोर अशी फळ, फुल झाडांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे शंभरच्या वर गुलाबांच्या विविध रंगी प्रजाती आहेत. सोबतच सर्व प्रकारचे कॅक्टस, झेंडू, झेनिया, जरबेरा, मिनीचर तसेच विविध रंगी फुले आहेत. काळ्या रंगाचा गुलाब या फार्मचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आंब्याचीही झाडे आहेत.

यात प्रामुख्याने लंगडा, अल्फान्सो, आम्रपाली तसेच अनेक आंब्याचे प्रकार आहेत. आंब्यासोबतच चिकू आणि आवळ्यांची ही झाडे आहेत. झाडांसाठी केवळ शेण खतांचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरी या फॉर्मचे एक वैशिष्ट्य आहे. लहान मुलांप्रमाणे या सर्व झाडांची आम्ही काळजी घेतो. सकाळपासून झाडांच्या मशागतीत आम्ही व्यस्त असतो. बोखारा येथील काही पत्रकारांनी नर्सरीला भेट दिली असता, मूळचे नेपाळचे रहिवासी असलेले दिनबहादूर यांनी सांगितले, येथे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचीही झाडे असल्याचे ते म्हणाले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Coal Ministry Identifies More Blocks to Enhance Coking Coal Production

Thu Dec 29 , 2022
NEW DELHI :-In order to further step up coking coal production, the Ministry of Coal has identified four coking coal blocks and the Central Mine Planning and Design Institute (CMPDI) also will finalize Geological Report (GR) for 4 to 6 new coking coal blocks in the coming months. These blocks may be offered in subsequent rounds of auction for private […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com