रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी १४ जलमित्रांची निवड

– विहीर/बोअरवेल धारकांवर होणार दंडात्मक कारवाई

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणाऱ्या १४ जलमित्रांची निवड करण्यात आली असुन सर्व जलमित्रांना त्यांचे नियुक्ती पत्र १४ मे रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते देण्यात आले.

रेन वॉटर हार्वेस्टींगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाद्वारे नेमले जात आहेत.जलमित्र म्हणुन काम करतांना त्यांच्या वॉर्ड मध्ये जनजागृती करून परीसरातील घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग करून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. जलमित्राच्या प्रयत्नांनी त्यांच्या परिसरात ११ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास जलमित्र, २१ घरी केल्यास सिल्वर जलमित्र,५१ घरी केल्यास गोल्डन, ७१ घरी केल्यास डायमंड तर १०१ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास नगर जलमित्र या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. 

पावसाद्वारे मिळणारे पाणी वाचविण्यास प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केले जावे यासाठी मनपा प्रयत्नशील असुन ७० वॉर्डसखींद्वारे घरोघरी माहितीपत्रक देणे तसेच विहीर / बोअरवेल असलेल्या घरी दंड करण्याच्या नोटीस देण्याचे काम सुरु आहे. हार्वेस्टींग करण्यास घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार ५,७ व १० हजार रुपये अनुदान दिले जाते तसेच पुढील ३ वर्षे मालमत्ता करात २ टक्के सूट सुद्धा देण्यात येते तसेच नविन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे सक्तीचे केले गेले आहे..

या कार्यक्रमात अनिल टहलियानी,सविता खाडे,स्मिता रेबनकर,माया खनके,मंगला रुद्रपवार,प्रज्ञा बोरगमवार, आशा  दूधपचारे,पायल अदलवार,वंदना राधापवार,अनघा येनारकर, अपर्णा चिडे,सुनीता दाणी ,सिमरन खिचडे,ज्योति कुंभारे या १४ स्वयंसेवकांना स्वेच्छेने जलमित्र म्हणुन काम करीत असल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या जलमित्रांनी स्वतः रेन वॉटर हार्वेस्टींग केले असुन इतरांनाही रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यास प्रेरीत करत आहेत.याप्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे,स्वयंसेवी संस्था,नियुक्त कंत्राटदार व मनपा अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Thu May 16 , 2024
नवी मुंबई :- खरीप हंगामात शेतक-यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उदभवणा-या अडचणींचे निराकरण व्हावे, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभाग व प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु झाला आहे. अशी माहिती ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com