इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै रोजी

मुंबई :– पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) दिनांक 20 जुलै 2022 ऐवजी आता रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. 

सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व काही ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा दि. 20 जुलै 2022 ऐवजी रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल.

            यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Fri Jul 15 , 2022
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा          मुंबई : महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा आणि कृषी-अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणूकीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.           वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी प्रिमियर आणि राज्य विकास, व्यापार आणि पर्यटन मंत्री रोजर कुक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com