नवीन कामठी पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून जनावराची तस्करी करणाऱ्या गाडीस पकडून आठ लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला..

कामठी ता प्र 13 :- मध्य प्रदेशातून नागपूर कडे जनावराची तस्करी करणाऱ्या वाहनाचा नवीन कामठी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 15 जनावरांना जीवदान देऊन दोन आरोपींना अटक करून आठ लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवारला पहाटे 5 वाजता सुमारास केली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इरफान अहमद फिरोज अहमद वय 23 राहणार वनदेवी नगर यशोधरा नागपूर, शेख अल्ताफ शेख आरिफ वय 21 राहणार टिपू सुलतान नगर नागपूर यांनी मिनी मालवाहू गाडी क्रमांक एम एच 49 एटी ९३१६ मध्ये बिना परवाना अवैधरित्या मध्यप्रदेशातून 15 जनावरे कोंबून नागपूर -जबलपूर मार्गे नवीन कामठी पोलीस ठाण्याहद्दीतील लिहीगाव शिवारातून पहाटे पाच वाजता सुमारास जात असताना गस्तीवर असलेले डीबी पोलीस पथकातील पोलिसांनी मालवाहू जनावरे वाहून नेणाऱ्या गाडीत हात दाखवून थांबलेले असता चालक इरफान अहमद याने जनावरे भारलेली गाडी घेऊन पसार झाला नवीन कामठी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पारडी ,यशोधरा, मानकापूर ,वाडी, हिंगणा ,बजाज नगर ,बर्डी ,पाचपावली मार्गे कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जनावरे भरलेली गाडी घेऊन पसार होत असताना पोलिसांनी कपिल नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने जनावरे भरलेली गाडी पकडली जाणारे भरलेली गाडी तपासली असतात गाडीत 15 जनावर कोंबून दिसून आली जनावर भरलेली गाडी नवीन कामठी पोलीस ठाण्यात आणून 15 जनावरे नवीन कामठी येथे गोरक्षनालयात सुरक्षित ठेवून नवीन कामठी पोलीस स्टेशनला आरोपी इरफान अहमद फिरोज अहमद ,शेख अल्ताफ शेख आरिफ, गाडी मालक, एक अब्राहार नाव, गाडी मालक, तिसरा मामू नावाचा इसम राहणार मध्यप्रदेश यांच्या विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 11 (1) (ड )(घ )अधिनियम 1960 सह कलम 83 ,177 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 15 जनावराची किंमत 3 लाख 75 हजार रुपये व गाडीची किंमत पाच लाख एकूण आठ लाख 75 हजार रुपयांचा मुद्द्यामाल जप्त केला वरील कारवाई नवीन कामठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भरत शिरसागर ,दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, डीबी पथकाचे हेट कॉन्स्टेबल संदीप सगणे ,संदेश शुक्ला, कमल कनोजिया ,अनिकेत सांगळे ,संजीवकुमार उपाध्याय यांच्या पथकाने केली..

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com