दुध अनुदान योजनेचा लाभ घ्यावा   

नागपूर :- राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ खाजगी प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर रुपये ५/- अनुदान देण्याची योजना १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील सहकारी दुध संघ आणि खाजगी दुध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर ५ /- रूपये अनुदान देय राहील, तसेच सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पामार्फत दुध उत्पादक शेतकरी यांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ करिता या गुणप्रतीकरिता किमान रु.२७ प्रतिलिटर इतका दर संबंधित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैायक्तिक खात्यावर रोख विरहीत ऑनलाईन भरणे बंधनकारक असणार आहे.

या योजनेची अमंलबजावणी करण्यासाठी बँकेमार्फत प्रकल्पांना विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुध उत्पादकांना दुभत्या जनावरांची माहिती पोर्टलवर सादर करायची आहे.राज्य शासनाच्या अनुदान योजनेमुळे राज्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पांला दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अनुदान योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस.एल नवले यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील शिंदे सरकार ओबीसी विरोधी - प्रसन्ना उर्फ राजा तिडके

Thu Feb 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे सरकार ही ओबीसी विरोधी असून ओबीसी समाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.ओबीसी समाजाच्या कुठल्याही मागण्या पूर्ण होत नसल्याची खंत कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रसन्ना उर्फ राजा तिडके यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. ओबीसींच्या मागण्याकडे लक्ष पुरविले असता ओबीसींचे वस्तीगृह अद्यापही सुरू झाले नाही,शासकीय पदभरती अजूनही अपूर्ण आहे,ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com