महानिर्मितीच्या भरतीत अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, अधिसूचना जारी

महानिर्मितीच्या संकेतस्थळावर अधिसूचना उपलब्ध

नागपूर :- महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्रमांक १०/२०२२ अन्वये अनुक्रमे “सहाय्यक अभियंता” व “कनिष्ठ अभियंता” या पदांची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत अधिवास प्रमाणपत्राबाबत उमेदवारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता मात्र आता नमूद पदांकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे बंधनकारक असल्याची अधिसूचना महानिर्मितीने २१ नोव्हेंबर रोजी काढली असून त्याची प्रत महानिर्मितीच्या www. mahagenco. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) भीमाशंकर मंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सदरील पदांकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com