सराईत गुन्हेगार श्रीहरी वातु थोटे याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येणाऱ्या इजनी ता. मौदा जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार श्रीहरी बातु पोटे, वय ३९ वर्ष, रा. इजनी पोस्ट मोरगाव ता. मौदा जि. नागपूर हा मागील २ वर्षापासून अरोली, मौदा या परिसरात गुंडगिरी करून रेती चोरी करणे सारखे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो. नागपूर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरुद जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्याचेविरुध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे. परंतु श्रीहरी याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सुधारणा झाली नाही. त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु श्रीहरी याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरुच ठेवली. श्रीहरी याचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण कडुन MPDA कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. १२/०८/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, नागपूर यांनी सराईत गुन्हेगार श्रीहरी वातु थोटे याचे विरुद्ध स्थानबध्दता आदेश काढुन त्यास १ वर्षाकरीता स्थानबध्द केले..

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, सहायक फौजदार सुरज परमार, पोलीस हवालदार निलेश बर्वे, पोलीस अंमलदार होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सराईत गुन्हेगार मुकेश दद्दुजी राजपांडे याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षांकरीता केले स्थानबध्द

Thu Aug 17 , 2023
स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई  नागपूर :- पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येणाऱ्या संत रोहीदास चौक कुही ता. उमरेड जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार मुकेश ददुजी राजपांडे, वय ३४ वर्ष, रा. संत रोहीदास चौक कुही ता. उमरेड जि. नागपूर हा मागील ३ वर्षापासून कुही परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा कुही परिसरात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com