नागपूर :- बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गवरील ‘विद्युत भवन’ या कार्यालयात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्यावेळी महावितरण़च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) समीर शेंद्रे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांनी देखील महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले.