अवैध गुटखा व सुगंधित तंबाकू दुकानावर पीएसआय आकाश माकनेची धाड.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

– एकूण 11 हजार 830 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीस अटक
कामठी ता प्र 15 :- राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाकूजन्य पदार्थाची विक्री कामठीत सुरू असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक केरबा उर्फ आकाश माकने यांनी काल दुपारी 4 दरम्यान गोल बाजार चौकातील नौशाद पान मटेरियल होलसेल दुकानात धाड घालून अवैध तांबकुजन्य पदार्थ व गुटखा असा एकूण 11 हजार 830 रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव मो शाहिद वल्द मोहम्मद कमाल वय अंदाजे 45 वर्षे रा लकडगंज कामठी असे आहे.या कारवाहिने बाजारात अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
ही यशस्वी कार्यवाही डीसीपी चिन्मय पंडित, एसीपी नयन आलूरकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने व सहकारी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com