नागपूर :- दिनांक १९.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १२ केसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण १३ केसेसमध्ये एकुण १३ ईसमांवर कारवाई करून १६,५६०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०२ केसेसमध्ये एकुण ०२ ईसमांवर कारवाई करून १,३२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६,९०० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,१५,०००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.