लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण न मिळाल्यास नवनीत राणांनी धनगरांना मते मागू नये – दिलीप एडतकर

– धनगर आरक्षणाचे समर्थनच , आरोपांना योग्य वेळी उत्तर देऊ : नवनीत राणा

दर्यापूर :-लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगरांना आरक्षण दिले नाही तर भाजप किंवा भाजप समर्थक दत्तक उमेदवारांनी धनगरांना मत मागू नये असा थेट इशारा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी समोरासमोर दिला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दर्यापुर येथे एकाच व्यासपीठावर आले असता एडतकरांनी तोफ डागली. माजी आमदार हरिभाऊ भदे यांच्या अध्यक्षतेत ,दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत हा सामना रंगला एडतकरांच्या वक्तव्यावर त्यांच्या आरोपाला आपण योग्य वेळी जोरदार उत्तर देऊ असे प्रत्युत्तर खासदार नवनीत राणा यांनी याप्रसंगी दिले.

धनगरांना मते मागू नका

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना धनगर समाजाने भरघोस मतदान केले त्यामुळे त्या निवडून आल्यात परंतु धनगरांना मात्र आरक्षण मिळाले नाही नवनीत राणा यांनी लोकसभेत धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता तथापि त्याचे कोणतेही फलित झाले नाही त्तुम्ही प्रश्न विचारला परंतु आमचा प्रश्न निकाली निघाला नाही त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगरांना आरक्षण मिळाले नाही तर भाजपा किंवा भाजपा समर्थित उमेदवाराने धनगरांना मते मागू नये आणि धनगरांनी अशा उमेदवारांना पराभूत करावे अन्यथा त्याला अहिल्यादेवी चे नाव घेण्याचा अधिकार नाही अशा तीव्र शब्दात दिलीप एडतकर यांनी नवनीत राणा यांच्यासमोरच त्यांना करडा इशारा दिला महाराष्ट्र सदनात माफी वीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून जो अवमान केला त्याबद्दल भाजपच्या एकाही भामट्याने किंवा भाजप-समर्थीत किंवा प्रणित नेत्यांनी निषेधाचा एक शब्दही काढला नाही त्याचा आम्ही धिक्कार करतो असेही दिलीप एडतकर यांनी आपल्या भाषणात म्हटले सध्या अहिल्यादेवी होळकरांचे नाव जिल्ह्याला, विद्यापीठाला किंवा वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा प्रकार सुरू आहे आरक्षणाच्या मोबदल्यात नामांतराची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे अहमदनगरचे अहिल्यानगर केल्याबद्दल धनगर समाज सरकारचा आभारी आहे परंतु ही अक्कलदाढ एव्हढ्या उशीरा का फुटली ? या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे , आमची मागणी नामांतराची नसून आरक्षणाची आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षण न देणाऱ्यांना धनगरांनी धडा शिकवावा असे आवाहन दिलीप एडतकर यांनी केले.

मी धनगरांसोबतच नवनित

माझ्या विजयात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा असून धनगरांनी मला भरभरून मतं दिली आणि त्यामुळे मी विजय होऊ शकले याची जाणीव मला आहे अशी आपल्या भाषणाची सुरुवात करत धनगरांच्या प्रश्नावर आपण नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे लोकसभेत हा प्रश्न आपण विचारला होता आणि यापुढेही धनगर आरक्षणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे खासदार नवनीत राणा यांनी भाषणाच्या प्रारंभी म्हटले आजचा कार्यक्रम राजकीय नाही त्यामुळे आपण इथे राजकीय काही बोलणार नाही परंतु जे आरोप इथे करण्यात आलेत त्याला योग्य वेळी राजकीय व्यासपीठावर योग्य ते उत्तर देण्यात येईल असा पलटवार खासदार नवनीत राणा यांनी केला धनगर समाज आरक्षणास पात्र असून धनगर समाजाच्या या मागणीसाठी आपण नेहमी धनगर समाज व सोबत राहू आपण केव्हाही द्या आपण त्याला साथ देणार असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. धनगर या शब्दातील र चा ड झाला आणि त्यामुळे फार मोठ्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित व्हावे लागले धनगर समाजावर हा अन्याय अनेक वर्षापासून होत आहे शरद पवार यांच्या काळात पासून समाजाने हा प्रश्न लावून धरला आहे परंतु अद्याप त्याची सोडवणूक झालेली नाही या प्रश्नासाठी आपण धनगर समाजाच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभ्या राहो असे आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी याप्रसंगी दिले या विषयाचे राजकारण करण्यात येऊ नये त्याला सडेतोड उत्तर दिला जाईल असा इशारा त्यांनी आपल्या भाषणातून दिला.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे

धनगर समाज महाराष्ट्रात फार मोठ्या संख्येने असून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपले समर्थ असून धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच अग्रेसर असतो असे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या भाषणात म्हटले धनगर समाजाच्या कोणत्याही प्रश्नासाठी आपण मला केव्हाही आदेश द्या त्या आदेशाचे तंतोतंतपालन आपल्याकडून होईल असे आमदार बळवंत वानखेडे यांनी म्हटले

आरक्षण जिव्हाळ्याचा प्रश्न

धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आरक्षण नसून कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाची मागणी आम्ही सोडणार नाही आरक्षणामुळे समाजाची प्रगती होईल आणि म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हरिदास भदे यांनी केले. महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवून जो अवमान महाराष्ट्र सरकारने केला आहे तो निषेधार्थ असल्याचे हरिभाऊ भदे यांनी म्हटलं. अकोला जिल्हा परिषदेचे माजी सभापती बळीराम बळीराम चिकटे आणि विद्यमान सभापती ज्ञानेश्वर सुलताने यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.

NewsToday24x7

Next Post

वायु प्रदुषणास जबाबदार डंपिंग यार्ड हटवा, भाजपच्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन.

Mon Jun 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी प्रतिनिधि 5 जून – नगर परिषद कामठीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील डंपिंग यार्ड च्या मानव निर्मित आगी मुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असुन डंपिंग यार्ड हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन प्रभाग 15 च्या भाजपा नगरसेविका संध्या रायबोले यांनी खासदार कृपाल तुमाने यांना रविवारी सोपविले यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले उपस्थित होते  डंपिंग यार्ड […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com