– ईव्हीसाठी नागपूरला सज्ज करण्याचे उद्देश
नागपूर :- वाढत्या वाहनांमुळे होणारे हवेचेप्रदूषण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांना प्रोत्साहनदेण्यासाठी नागपूर महानगरपालिका येथे विशेष ईव्ही सेलची स्थापना करण्यात आली आहे.नागपूर शहरात विद्युत वाहनांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून शहराला विद्युत वाहनांच्या वापरासाठी संपूर्णतः सज्ज करण्याच्या उद्देशाने या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात विद्युतवाहन (ईव्ही- इलेक्ट्रिक व्हेहिकल) सेलची स्थापना करण्यात आली आहे.
नुकतीच मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याअध्यक्षतेखाली या सेलची पहिली बैठक पार पडली. बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त सुरेश बगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ईव्ही धोरण, 2021 द्वारे नागपूर शहरासाठी निर्धारित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी ईव्ही सेलची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ईव्हीसेल मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या विविधविभागांसह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), नागपूर नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आरटीओचे प्रतिनिधी यांचासमावेश आहे.
ईव्ही सेलच्या माध्यमातून विद्युतवाहनांसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅनतयार करण्यात येणार आहे, तसेच येत्याशनिवारी २० जानेवारी रोजीसकाळी १० वाजतापासून हॉटेल रेडीसन ब्ल्यू येथे “सिटी ईव्ही एक्सीलरेटर” कार्यशाळेचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे. कार्यशाळेत शासकीय, खाजगीक्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थिती राहणार आहेत.