कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत खरडा सह संपूर्ण मौदा तालुक्यात लोकप्रतिनिंकडून शासकीय फंडातून निधी खर्च करून गावागावात देण्यात आलेल्या सार्वजनिक बैठक खुर्च्या या सार्वजनिक न राहता बहुतांश खुर्च्या या खाजगी झालेल्या आहेत ,त्यामुळे यापुढे लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बैठक खुर्च्या शासकीय फंडातून न देता स्वतःच्या खर्चातून द्यावे अशी मागणी खरडा येथील उपसरपंच वसंता भाजीपाला यांनी केली आहे. त्यांनी याबाबत अरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली आहे हे विशेष.