केळवद :- येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदार व्दारे माहीती मिळाली कि, छिंदवाडा रोडकडुन केळवद मार्गे नागपूर येथे पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखुबी वाहतुक होत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्टाफ यांनी छिंदवाडा रोडकडुन केळवद मार्गे नागपूर येथे नाकाबंदी केली असता एका पांढऱ्या रंगाची कार क्र. एम. एच ०४/ई एच-२८५४ ही येताना दिसल्याने सदर वाहनास स्टाफच्या मदतीने थांवण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने आपली कार रोडच्या कडेला थांबवली असता सदर वाहन चालक यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव राकेश अशोक आतराम वय ३६ वर्ष रा रामेश्वरी रोड पार्वती नगर गल्ली नं २ जीवन शाळेसमोर नागपूर असे सांगीतले त्यास सदर वाहनामध्ये मागे काय आहे याबाबत विचारपुस केली असता वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तंगाखु मिळून आला तो खालिलप्रमाणे 1) सुगंधीत तंबाखु जनम ५३५,१६८ नग, एक नग ५०० ग्रॅम नग कि २५० रू किमत ४२,००० रू २) सुगंधीत तंबाखु रिमझिम ग्रॅन्ड १२० नग एक नग ५०० ग्रॅम नग कि ५५० रू किमत ६६,००० रू ३) सुगंधीत तंबाखु १४० नग कि १९५ रू २७,३०० रू, ४) सुगंधीत तंबाखु, ४० नग कि १५० रू किमती ६००० रू ५) सुगंधीत तंबाखु ५०० ग्रॅम वजनाचे ६० नग कि २५० रू किमती १५००० रू. ६) पान मसाला पान पराग ११२.५० ग्रॅम १०० पाकीट प्रती पॉकीट २५० रू किंमत २२५०० रू असा एकुन वजन २८१.५ किलो किंमत १,७८,८०० रू चा माल ७) पांढ-या रंगाची कार कमाक, एम एच ४० ई एच २८५४ अंदाजे किंमत ४,००,०००रू चा एकुन किंमत ५,७८,८०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार, अण्पर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उप विभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग, सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि अनिल राउत ठाणेदार पो.स्टे केळवद पोहवा दिनेश काकडे, पोहवा मंगेश धारपुरे, पोशि गणेश उईके, पो.शि विजय क्षिरसागर, पो. स्टे केळवद यांनी केली आहे.