नागपूर :- मोदी@9 महासंपर्क अभियानाचा आज शुक्रवार (९ जून) पासून शुभारंभ झाला. मध्य प्रदेश सरकार मधील सहकारिता एवं लोक सेवा प्रबंधन विभागाचे मंत्री डॉ. अरविंद सिंग भदौरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर, गडचिरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया आणि वर्धा या चार लोकसभा मतदार संघामध्ये हे अभियान पार पडणार आहे.अभियानातील ना. डॉ. अरविंद सिंग भदौरिया यांच्या या प्रवास दौऱ्यात गुजरात राजकोट येथील राज्यसभा खासदार रामभाई मोखारिया, क्लस्टर प्रमुख खासदार रामदास तडस व क्लस्टर संपर्क प्रमुख भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम हे उपस्थित आहेत. गुरुवारी ८ जून रोजी सहकारिता एवं लोक सेवा प्रबंधन विभागाचे मंत्री डॉ. अरविंद सिंग भदौरिया यांचे नागपूर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम, संजय बंगाले , रामभाऊ आंबुलकर, गजेंद्र पाढे व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत केले.
शुक्रवारी ९ जून रोजी मोदी@9 महासंपर्क अभियानाची सुरूवात नागभिड येथून झाली. येथे मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुढे दुसरी बैठक ब्रम्हपुरी त्यानंतर गडचिरोली येथे बैठक झाली. या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. तसेच विविध ठिकाणी व्यापारी बांधवांशी देखील चर्चा करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली येथे दिवसभराच्या अभिनाचा समारोप झाला.
शनिवारी १० जून रोजी गडचिरोली येथून गोंदिया कडे मान्यवर रवाना होतील. या मार्गावर लाखांदूर त्यानंतर अर्जुनी मोरगाव येथे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापारी बांधवांशी चर्चा करून नागपुरकडे प्रस्थान केले जाईल. रविवारी ११ जून रोजी मान्यवर वर्धा लोकसभा क्षेत्रात व्यापारी बांधव आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. रविवारी दुपारी नागपुरात परत आल्यानंतर नागपुरात भाजपा च्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ना. डॉ. अरविंद सिंग भदौरिया संवाद साधतील. यानंतर अभियानाचा समारोप होईल, अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.