विदर्भाचे पंढरपुर धापेवाडा येथे आढावा बैठक

नागपूर :- पंढरपुरला जे वारकरी जाऊ शकले नाही. ते वारकरी विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून विख्यात असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडयात विठुरायाच्या दर्शनाला येतात. विदर्भ पंढरपुर म्हणून गणल्या जाणा-या श्रीक्षेत्र धापेवाडयात चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल रुख्मीणी मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दुस-या दिवशी पंढरपुर येथुन प्रत्यक्ष भगवंत धापेवाडयात दाखल होतात, अशी आख्यायिका आहे, या दिवशी हजारोच्या संख्येने विदर्भासह मध्यप्रदेश व इतर ठिकाणाहुन भाविक मोठ्या प्रमाणात श्रध्देने येत असतात. यंदा ही यात्रा भरणार असल्याने भाविकांची सोयी सुविधा करणे सुरू आहे.

श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमीत्त दि. १७/०७/२०२४ रोजी व आषाढी प्रतिपदा निमीत्त दि. २२/०७/२०२४ रोजी मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार असल्याने हर्ष पोद्दार पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण व अनिल म्हस्के सहाय्यक पोलिस अधिक्षक सावनेर यांनी संयुक्त पणे भेट देवुन यात्रा परिसराची पाहणी केली. व आढावा घेवुन मंदीर ट्रस्ट कमेटी सचिव सदस्य यांना भाविकांचे सुरक्षितते बाबत उपाय योजना करण्यात बावत मार्गदर्शन सुचना दिल्या. कोणतीही अनुचीत घटना घड्डु नये शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोणातून मार्गदर्शन करण्यात आले. सदर आढावा बैठकीला रविंद्र मानकर पोलिस निरिक्षक सावनेर देवेंद्र वंजारी सहायक पोलिस निरिक्षक कळमेश्वर व रवि पवार, आदित्य पवार, विलास वैद्य विनोद मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीताविरूद्ध धडक मोहीम

Sat Jul 13 , 2024
सावनेर :- पोस्टे केळवद अंतर्गत खानगाव सावनेर येथे राहणारा आरोपी सेवकराम लच्छीराम कदरे, वय 56 वर्ष रा. वार्ड क्र. ३ खानगांव ता. सावनेर याचे घराची दारूवाबत भरझडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून प्रत्येकी १८० मिली देशी दारूने भरलेल्या ०५ प्लॉस्टिक सिलबंद बॉटल किमंती ३५०/-रु. चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली. दि. ११/०७/२०२४ रोजी पोस्टे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com