नागपूर, दि. 27 : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार, दिनांक 26 जून रोजी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसीलदार आर. के दिघोळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.