संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 122 मतदान केंद्रावर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.यासाठी 500 च्या वर कर्मचारी,शिक्षकांचीनियुक्ती करण्यात आली आहे तथापि यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील अनुभव पाहता सर्व शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना निवडणुकीतील कामाचा भत्ता तात्काळ मिळावा तसेच मतदान केंद्रावर शौचालयासह पिण्याचे पाणी व वॊपरण्याच्या पाण्यासह इतर सुविधा पुरवाव्यात अशी मागणी निवडणुकीत लागलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दबक्या आवाजात बोलून दाखवले आहे.
कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर ला मतदान होणार आहे यासाठी प्रशासनाने एकूण 122 मतदान केंद्र निश्चित केले आहेत तर निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध विभागातील 610 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांची पथके ईव्हीएम मशीन व इतर साहित्य घेऊन आज 17 डिसेंबर ला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले.तथापी यापूर्वीच्या अनेक निवडणुकीचा अनुभव काहीसा नकारात्मक असल्याचे कर्मचारी सांगतात.
-निवडणूक भत्ता तात्काळ मिळावा
—–भारतीय लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असलेली आणि तितकीच जोखमीची असलेली मतदान प्रक्रिया शिक्षक व कर्मचारी दरवेळी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नेटाने पार पाडतात.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा मोबदला कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळतो तथापी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामाचा मोबदला बराच उशीर होऊनही मिळत नसल्याचे सांगण्यात येते.हा अनुभव पाहता 18 डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीच्या कामाचा मोबदला शिक्षक व कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळावा अशी मागणी कर्मचारी व शिक्षकाकडून जोर धरत आहे.