अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष चाबी संघटनांचे आमदार विनोद अग्रवाल यांनी अखेर आज मुंबई येथे भाजप पक्षाला समर्थन दिला आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांचे उपस्थित भाजप पक्षाला समर्थन
आमदार विनोद अग्रवाल प्रत्र देऊन केला आहे.
विनोद अग्रवाल हे अगोदरच भाजपचे सकिय नेते होते.2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवार मिळणार होती.परंतु आमदार गोपाल अग्रवाल यांनी काँगेस पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारी त्यांना मिळाली होती.अशावेळी बंडखोरी करित अपक्ष उमेदवार म्हणून चाबी संघटनां स्थापन करून निवडणूक लढविली व त्यात विनोद अग्रवाल हे विजयी झाले होते.त्यांनतर आज अखेर त्यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षाला पत्र देऊन आपला समर्थन दशविला आहे.