ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता ‘महाज्योती’तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

– संकतेस्थळावर 3 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 19 जून 2024 पासून सुरु केलेली आहे. सदरचे अर्ज हे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा तारीख 3 जुलै 2024 असून विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

महाज्योतीमार्फत UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, MPSC राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, MPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, बँकिंग, एलआयसी, रेल्वे परीक्षा पूर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील,निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे, असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले.

महाज्योतीचे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणावर विहित कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत

Fri Jun 21 , 2024
– दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे – आयुषी सिंह गडचिरोली :- दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या 10 जोडप्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे हस्ते जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com