आमडी ते पारशिवनी रोड अपघातात पोलीस हवालदार चे निधन. 3 किरकोळ जख्मी तर गभीर 3

जख्मीना उपचारासाठी नागपुरला पाठवले.

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल आमडी ते पारशिवनी रोडवर धरम कांटा समोर बेजबाबदार कार चालकाने निष्काळजीपणाने स्विप्ट कार चालकाने आज बुधवार दिंनाक२३/११/२०२२ पारशिवनी पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस शिपाई जयंत विष्णु शिरेकर वय ३९ वर्षे यांचे २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८-३० दरम्यान अपघातात निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशाप्रकारे आहे की आमडी फाटा नया कोण महामार्गावर धरमकाटा समोर 23 नोव्हेंबर रोजी कार व ट्रकच्या किरकोळ अपघात झाला असल्याने त्यात पंचनामा करण्याकरिता पोलीस हवालदार जयंत शिरेकर व पोलीस शिपाई रुपेश राठोड हे घटनास्थळी गेले असता तेव्हा इतर सामान्य नागरिक घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान आमडी फाटा कडून अति वेगाने निब्काळजी पणाने स्वीप्ट कार क्रमांक एम.एच. ४० सी.एच ६३९३ ही अतिगतीने आली व तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रोडवर असलेल्या पोलीस हवालदार जयंत शिरेकर व अन्य इतरांच्या गर्दीत टाकली तेव्हा पोलीस हवालदार जयंत शिरेकर हा गाडीत आल्यामुळे गंभीर जखमी  होवून जागीच मृत्यू झाला तर अन्य गंभिर घायल अमोल कनोजे पारशिवनी,व संदीप तिजोरे, व आकाश काबळे राहणार मेहंदी गंभिर जखमी झाले तिन्ही लोकाना  त्याना शासकीय मेडिकल  हॉस्पिटल नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. किरकोळ जख्मी समाज सेवक गौरव पनवेलकर , नगर सेवक सागर सायरे ,प्रकाश तिजारे यांना उपचार करून सुट्टी दिली स्विष्ट डिजायर कार क्रमाक एम एच ४० सि एच ६३९३ पोलीसात जमा केली असून चालक फरार झाला आहे. पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण, नागपूरच्या गौरवात मानाचा तुरा

Thu Nov 24 , 2022
नागपूर :- भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अधिपत्त्याखाली तसेच आसाम राज्य ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आसामची राजधानी गुवाहाटी येथे नोव्हेंबर 2022 मध्ये संपन्न झालेल्या 37 व्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी नागपूरच्या खेळाडू नयन प्रदिप सरडे याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. नागपूरचा क्रीडाविश्वात गौरवाचा मानाचा तुरा रोवला. त्याने अठरा वर्ष आतील मुलांच्या गटात 110 मिटर हर्डल्स स्पर्धेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com