पो.स्टे. नरखेड हद्दीमधील येथील जुगार अड्डयावर धाड

नरखेड :- येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील मौजा बेलोना शिवारात भरतु पटेल यांच्या शेताजवळ पांदन रस्त्यात काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी मौजा बेलोना शिवारात भरतु पटेल यांच्या शेताजवळ सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे धनराज उकंडराव चरपे, वय २९ वर्ष, रा. बेलोना ०२) नरेश भाउरावजी सावरकर, वय ३० वर्ष, ०३) यादव गणपतरावजी अलौने, वय ४० वर्ष, ०४) किशोर लक्ष्मण बारमासे, वय २८ वर्ष, ०५) तुळशीराम बाबुराव वषाळे, वय ४० वर्ष, सर्व रा. बेलोना तह नरखेड हे जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण ०५ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन नगदी १००००/- रूपये, १५ फुट लांब व ०६ फुट रूंदी ताडपतरी किंमती ८००/- रू. व हातात १५ तासपत्ते डावावर ३७ तास पत्ते असा एकूण १०,८००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे नरखेड कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अंबोला शिवार नरखेड येथे खाली जागेत ५२ ताशपत्त्यावर हारजितचा जुगार खेळणारे आरोपी १) राजेंद्र माधवराव मोहीतकर, वय ६० वर्ष ०२) अफसर पिर मोहंमद शेख, वय ४५ वर्ष ०३) सेवकराम लक्ष्मण बावणे वय ३७ वर्ष, ०४) भुषन अशोक धकिते वय २९ वर्ष ०५) राकेश उईके, वय ४१ वर्ष सर्व रा नरखेड हे जुगार खेळतांनी मिळुन आले. आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातून नगदी ४००० रूपये व खुले तासपत्ते डावावर ४५ तास पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे नरखेड येथील ठाणेदार सपोनि. कृष्णा तिवारी व त्यांबा स्टाफ यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक

Wed Jul 10 , 2024
– पोलीस स्टेशन भिवापूरची कार्यवाही भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी कडून माहिती मिळाली की पवनी कडून उमरेड कडे एक एल.पी ट्रक टिपर क्रमांक MH-40 CM- 7864 विनापरवाना अवैधरेता रेतीची चोरटी वाहतूक करताना जात आहे अशा खबरे वरून स्टाफ यांनी नक्षी शिवारात प्रभावी नाकाबंदी लावून एल पी ट्रक व एल पी ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com