चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची प्रतिज्ञा घेणाऱ्या नागरीकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजीत करण्यात आली असुन या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या शहरी मंत्रालयाने स्वच्छतेची जागृती प्रत्येक नागरीकांत व्हावी या दृष्टीने स्वच्छोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे. ७ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होऊन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ३१ मार्च २०२३ पर्यंत स्वच्छतेची प्रतिज्ञा लकी ड्रॉ स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.लकी ड्रॉ द्वारे स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात येणार असुन विजेत्यांना प्रथम बक्षिस चार्जेबल ट्रॉली स्पीकर, द्वितीय बक्षिस स्मार्ट वॉच, तृतीय बक्षिस हेल्मेट व प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन १० ब्लुटुथ हेडफोन दिले जाणार आहेत.
यात चंद्रपूर शहरातील नागरीकांना आपण स्वच्छतेप्रती जागृत आहोत हे दर्शविण्यासाठी स्वच्छता प्रतिज्ञा (Swachhta Pledge) घ्यावयाची आहे. स्वच्छता प्रतिज्ञा घेणारे नागरीक ज्या शहरातील अधिक असतील त्या शहराला शासनातर्फे पुरस्कृत करण्यात येणार आहे. स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यासाठी या लिंक वर जाऊन स्वच्छतेची शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड करावयाचे असुन ते प्रमाणपत्र https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemSNcKamRJxgj3dlotM9Ygcpe1AsUZgcOI_z-LKXX5Zjc0Mw/viewform या गुगल लिंक वर अपलोड करायचे आहे.सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेज वर सुद्धा उपलब्ध आहे.तेव्हा अधिकाधिक नागरीकांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या शहरास विजयी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.