प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात महाशिवरात्री पर्व मोठ्या उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भगवान शिव ची ईश्वरीय आराधनेतुन मनुष्याच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होत असल्याने मनुष्याला सर्वांगीण विकासाच्या मार्ग प्राप्त होत असल्याचे मत ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संस्थापिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता यांनी महाशिवरात्रि पर्ववर मार्गदर्शन करताना व्यक्त केले महाशिवरात्रि पर्वाची सुरुवात राजयोगिनी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी यांचे हस्ते ध्वजारोहण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी माजी आमदार देवराव रडके ,कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, माजी सभापती सेवक उईके, माजी उपसभापती विमल साबळे, उपसरपंच अंकिता तळेकर ,वैशाली डोनेकर ,पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे, घनश्याम चकोले, वसंता ठाकरे ,सुनील भालकर, हरिहर गायधने ,राजेश आहुजा, सतीश महेंद्र ,मुकेश पराते, वंदना दीदी, शिलु दीदी उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजयोगिनी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी म्हणाले भगवान शिव ची आराधना केल्याने मनुष्यांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होत असतो त्यातूनच मनुष्याला यशाच्या मार्ग प्राप्त होऊन सर्वांगीण कल्याण साधता येत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे संचालन वंदना दिदी यांनी केले व आभार प्रदर्शन शीलु दीदी यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यू खलाशी लाईन येथे 43 हजार रुपयांची घरफोडी

Mon Mar 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन येथे एका कुलुपबंद घरात चोरट्यानी घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात सुरक्षित ठेवलेले नगदी 31 हजार रुपये व एक सोन्याची साखळी असा एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याची घटना सकाळी सात वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी संदीप अरुण मेश्राम ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com