लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम यांनी दिला आमरण उपोषणाचा ईशारा…

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- लोकाधिकार परिषदेच्या वतीने 11 डिसेंबर पासून कामठी तहसील समोर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या राजीनामे सहित अन्य चार मागण्याला घेऊन लोकाधिकार परिषदचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब आमरण उपोषण करणार आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशन 2022 ला लोकाधिकार परिषदेच्या वतीने विधानसभेवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे निवेदन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतले होते व अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री गृहमंत्री व वित्तमंत्री यांच्यासोबत बैठक लावून देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते, हिवाळी अधिवेशन 2023 आले तरी शंभूराज देसाई यांनी बैठकीचे आयोजन केले नाही म्हणून लोकाधिकार परिषदेने शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंबंधी लोकाधिकार परिषदेच्या शिष्टमंडळाने कामठीचे तहसीलदार पोयाम व कामठी चे वरिष्ठ पी.आय. प्रमोद पोरे, पी.आय. निरीक्षक दिपक बेताडे,एपीआय राजेश गडवे यांची भेट घेऊन विभिन्न मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यचे पोलीस महासंचालक यांच्या नावाची निवेदने दिले. शंभूराज देसाई यांच्या राजीनामाच्या मागणी सहित मैत्रेय उद्योग समूहाचया चेअरमन वर्षा सतपालकर यांना त्वरित आता अटक करणे, मैत्रेय समूहाची प्रॉपर्टी शासनाच्या ताब्यात असल्यामुळे शासनाने गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे पैसे परत करावे, सगळ्या फसवणुकीच्या केसेस गुन्हेगारी कायद्या अंतर्गत चालविण्यात याव्या, यासाठी शासनाने त्वरित उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करणे,शिष्टमंडळाचे नेतृत्व लोकनेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केले. प्रसिद्धी पत्रकार लोकाधिकार परिषदेच्या महासचिव माया उके म्हणाल्या मैत्रेय उद्योग ग्रुपच्या चेअरमन वर्षा सत्पाळकर यांनी आर डी एफ डी च्या नावाखाली अधिकचे कमिशन देणे, 14 वर्षांमध्ये पेन्शन देणे असे आमीष दाखवून महाराष्ट्र सहित 14 राज्यातील 2 कोटी 16 लाख लोकांची फसवणूक केली व 2500 कोटी रुपयांच्या घोटाळा केला. या 2 कोटी 16 लाख लोकांमध्ये 2 कोटी महिलांची फसवणूक झाली. या 2 कोटी महिलांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकनेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्या नेतृत्वात मागच्या 1 वर्षापासून राज्य सरकार बरोबर लढा सुरू आहे. दोन कोटी महिलांची फसवणूक होते व राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री राज्याचे वित्तमंत्री यांना या विषयावर चर्चा करायला वेळ नाही म्हणून 11 डिसेंबर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कामठी तहसील कार्यालयासमोर लोकनेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब आमरण उपोषण करणार आहेत व या आंदोलनामध्ये विदर्भातील सगळे गुंतवणूकदार व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती माया उके यांनी दिली. शिष्टमंडळामध्ये माया उके, चंद्रशेखर पाचोडे, किरण कुंभारे, करुना मेश्राम, लता तामंसेटवार, तारा मते,सिंदु पाचोळे, नंदा कुंभारे, सोनाली नगरारे, दिवेश उके, सुरेखा मानकर, भोला मानकर इत्यादीचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना मातृशोक..

Sat Dec 2 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 3:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष ,लॉंग मार्च चे प्रणेते व माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या ज्येष्ठ भगिनी व बिडी कामगारांचे हृदय सम्राट दिवंगत कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धांगिनी व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका आई 86 वर्षीय नलिनीताई कुंभारे यांचे वृद्धपकाळाने व अल्प आजाराने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com