युवक काँग्रेस कडून पोलिस भरतीच्या मागणीसाठी नागपूर ते नाशिक बाईक रॅली

नागपुर :- देवडिया काँग्रेस भवन येथे मा. नगरसेवक म.न.पा. व महासचिव राष्ट्रीय युवक काँग्रेस बंटी बाबा शेळके तर्फे नागपूर ते नाशिक बाईक रॅली संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

14 मार्च ला नाशिक येथे पोलीस भरतीच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मित्रांसह जननेते राहुल गांधी यांची भेट आणि सर्व मित्र भारत जोडो न्याय यात्रेत राहुलसोबत सामील होण्या करीता बाईक रॅली ने जात आहे.बाईक रॅली ही 12/03/2024 ते 14/03/2024 तारखेपासन नागपूर शहरतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,महाल – ते नाशिक इथपर्यंत आहे. 200 बाईक व 400 पोलिस भरती प्रशिक्षणार्थी आणि सहकारी रॅली मध्ये सहभागी असतील.

बाईक रॅली चा रूट हा नागपुर शहर शिवाजी महाराज पुतळा, महाल – चीटनविस पार्क चौक – अग्रसेन चौक – संविधान चौक – व्हेरायटी चौक – लोकमत चौक – राजीव गांधी पुतळा – एअर पोर्ट – बुटी बोरी – वर्धा – पुलगाव – मालेगाव – कारंजा लाड ( मुक्काम) – मेहकर – सिंदखेराजा – जालना – संभाजी नगर ( मुक्काम) – गंगापूर – येवला – नाशिक अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅली मधील पोलिस भरती प्रशिक्षनार्थी व सहकर्यांकरिता विविध ठिकाणी मेडिकल व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्यूस फ्रुट ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आज शहर अध्यक्ष तॉसिफ़ ख़ान, संजू ज़वाले,राकेश निकोसे, सागर चव्हाण, नयन तरवटकर, मोईज शेख,कुणाल खड़गी, अमन लूटे, इरफ़ान क़ाज़ी विजय मिश्रा, आदित्य गानार , सार्थक चीचमलकर, अनीकेत बानाइत,रोहित वाग्धारे, सलीम शाह, बाबू ख़ान, प्रफुल्ल ईजनकर, हिमांशु भोंसले, रोहन मसुरकर, अतुल नागपुरे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

The Voice of Media shines in 41 nations of the world 

Mon Mar 11 , 2024
Nepal :- the five principles prepared by the Voice of Media, for the welfare of journalism and journalist will be implemented in 41 countries of the world. The international journalist meet in Nepal had made it clear that the roots of the organisation have reached all over the world. The 41 heads of the organisation from various countries attended the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights