माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना मातृशोक..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 3:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष ,लॉंग मार्च चे प्रणेते व माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या ज्येष्ठ भगिनी व बिडी कामगारांचे हृदय सम्राट दिवंगत कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धांगिनी व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका आई 86 वर्षीय नलिनीताई कुंभारे यांचे वृद्धपकाळाने व अल्प आजाराने आज रात्री साडे नऊ वाजता नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दुखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे परिसर स्थित ड्रॅगन पॅलेस टेम्पल नजीकच्या ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या निवास स्थानातून निघत त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता कन्हान नदी मोक्षधाम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या दुःखद घटनेने ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कामठी शहर तसेच आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आजनी येथे गुणवंत विद्यार्थी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

Sun Dec 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील आजनी गावातील सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाचा पंधरावा वर्धापन दिवस शनिवार दिनांक ०२ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गजलकार ज्ञानेश्वर वांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात उमेश मस्के, सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, गजानन घोडे, माला इंगोले, नामदेव भगत, शिवबा राजे फाउंडेशनचे कार्यकर्ते, पोलीस पाटील बळवंतराव रडके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com