पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार युवा चेतना दिन साजरा

– आज कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

– शाहिर संविधान मनोहर यांचा भीम गीतांचा जलसा

नागपूर :-पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा भीम सैनिकांचे हृदय सम्राट तरूण नेतृत्व  जयदिप कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी 23 स्पटेंबरला युवा चेतना दिन’ साजरा केला जाणार आहे युवा चेतना दिन’निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदुर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध अनाथालय रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. नागपुरातील सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आल्याची माहिती पीरिपा प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली

आनंद नगरात मुख्य सोहळा

देशातील आंबेडकरी बहुजन,अल्पसंख्याक, आदिवासी, वंचित घटकातील युवकांमध्ये संघर्षरुपी स्फूर्ती व एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना संविधानाच्या संरक्षणार्थ लढण्यास प्रेरित करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लाडके युवा नेते भाई जयदीप जोगेंद्र कवाडे हे 41 व्या वर्षात पदापर्ण करणार आहेत. देशभरात पीरिपा युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करणार असल्याचेही लिंगायत म्हणाले- नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात शनिवारी सायंकाळी ५ वाजता भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्राचे ख्यातनाम भीम शाहिर संविधान मनोहर यांच्या भीम गीतांचा जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रा- जोगेंद्र कवाड़े महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाई उन्हेवने जेष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर कवि ई. मो- नारनवरे यांच्यासह विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित राहतील- कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत,युवक प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी, नागपुर शहर अध्यक्ष कैलाश बोंबले, जेष्ठ नेते बालू मामा कोसमकर, नागपुर जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, नागपुर शहर युवक आघाडी अध्यक्ष सोहेल खान भगवानदास भोजवानी, अजय चव्हाण, नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष संजय खांडेकर, गौतम गेडाम, प्रकाश मेश्राम, प्रतिमा ज. कवाडे, सविता नारनवरे, पूनम मटके, शीतल खान, विपीन गाडगीलवार, रोशन तेलरांधे, पियुष हलमारे, सुरेश बोनदाडे, गौतम थुलकर, कुशीनारा सोमकुवर, वसीम खान, हिमांशु मेंढे प्रयत्नरत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

BMS ने CMOAI पर बोला हमला

Sat Sep 23 , 2023
– अफसरों का वेतन बढ़ा तो करेंगे विरोध नागपुर :- भारतीय मजदूर संघ (BMS) के कोल प्रभारी एवं जेबीसीसीआई सदस्य के. लक्ष्मा रेड्डी ने कोल माइंस ऑफिसर्स एसोसिएशन ऑफ इंडिया (CMOAI) और इसके लोग NCWA- XI में विघ्न डालकर औद्योगिक शांति भंग करने का प्रयास कर रहे हैं। छत्तीसगढ़ स्थित विश्रामपुर दौरे पर पहुंचे रेड्डी ने स्थानीय मीडिया से चर्चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com