‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सातारा पोलिस अधिक्षक समीर शेख यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांची ‘कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. ही मुलाखत शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी घेतली आहे.

सातारा जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची निवडणुकीच्या अनुषंगाने पुर्वतयारी, समाज माध्यमा वरती असलेली नजर, मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या दिवशी केलेली व्यवस्था, बंदोबस्त, सभा, रॅली यासाठी परवानगी, जाहीर सभांचे चित्रिकरण या बाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सातारा जिल्हयाचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले - ‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा आरोप

Thu Apr 18 , 2024
मुंबई :- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com