यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्याकरीता एकुण 461 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेकरीता 156 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. मॅक व्हेईकल प्रा.लि., राजवी अॅटोवर्ल्ड प्रा.लि. मॅक मोटर्स प्रा.लि. यवतमाळ, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी यवतमाळ, हिमालय कार्स यवतमाळ, टाटा अॅटोकॅम्प जिवाय बॅटरीझ, रांजणगाव, पुणे, पियाजिओ व्हेईकल बारामती पुणे, रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. यवतमाळ, गुरुलक्ष्मी कॉटेक्स प्रा.लि. यवतमाळ आणि श्रीनिवासा फार्म्स प्रा.लि. पांढरकवडा या कंपनी, उद्योजक मेळाव्यात सहभागी होणार आहे.
या सर्व कंपनी, उद्योजकांमार्फत 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदविधर तसेच व्यवसायीक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेता येणार आहे. उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in तसेच cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून दि. ११ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प.भ. जाधव यांनी कळविले आहे.