नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत राहणारे ४६ वर्षीय फिर्यादी यांचा १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा कॉलेजला जातो असे आपले घरी सांगुन घरून निघुन गेला होता. तो घरी परत न आल्याने, त्याचा शोध घेतला असता तो मिलुन आला नाही, त्याला कोणीतरी अत्तात आरोपीने फुस लावुन पल्लवुन नेले, अशा फिर्यादी यांचे तकारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे कलम १३७(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून व तांत्रीक तपास करून, नमुद मुलाचा शोध घेतला असता, तो बालाघाट (मध्यप्रदेश) येथे असल्याची माहिती प्राप्त झाली, पोलीसांनी बालाघाट (मध्यप्रदेश) येथे गेले असता, तो एक संशयीत महीलेजवळ दिसुन आला. दोघांनाही ताब्यात घेवुन, त्यांची सविस्तर विचारपूस केली. त्या दोघांचे समुपदेशन करण्यात आले. नमुद मुलाला व संशयीत महीलेला पुढील कारवाईस्तव वाठोडा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपुर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, मपोनि. ललीता तोडासे, स.फौ. गजेंद्रसिंग ठाकुर, पोहवा. श्याम अंगुलथेवार, राम निरगुडवार, दिपक विंदाणे, पोअं, ऋषीकेश डुमरे, विलास चिंचुलकर, शरीफ शेख, मपोअं. अश्विनी खोडपेवार व पल्लवी वंजारी यांनी केली.