नागपूर :- फिर्यादीची वहिणी नामे कलजीतकौर हुडा, वय ४७ वर्षे, रा. वैशाली नगर, पाचपावली, नागपूर या त्यांचे मोपेड क. एम.एच ४९ ए.यू ४९८१ ने पोलीस ठाणे सदर हदीतुन गड्डीगोदाम चौक येथुन आपले घरी जात असतांना, एक अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व धोकादायकरित्या चालवून फिर्यादीचे वहिणीचे मोपेड गाडीला धडक दिल्याने त्या खाली पडुन गंभीर जखमी झाल्या. जखमी यांना लोकांनी उपचाराकरीता विम्स हॉस्पीटल येथे नेले असता, उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी मनमीतसिंग जसबीरसिंग हुडा वय ४० वर्षे रा. अशोक चौक, गुरुनानकपूरा, प्लॉट नं. २००, पाचपावली, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे सपोनि. गुसिंगे यांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरूध्द कलम १०६(१) भा.न्या.सं., सहकलम १३४, १७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.