नागपूर :- फिर्यादी राहुल अरविंद मेंढे, वय ३२ वर्षे, रा. अशोक नगर, सिंधी कॉलोनी, प्लॉट नं. २८८, जब्बार हॉटेल जवळ, पाचपावली, नागपूर हे राऊत हॉस्पीटल इंदोरा चौक, पाचपावली, नागपूर येथे फिजीओथेरेपीस्ट म्हणून डॉक्टर आहेत. दिनांक २३.१२.२०२४ चे २३.०० ते दि. २४.१२.२०२४ थे ०७.०० वा. चे दरम्यान फिर्यादी हे त्यांची पाढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा आय गाडी क. एम.एच. ४९ ए.एफ. ३७१५ किंमती अंदाजे २०,०००/- रू. ची हॉस्पीटलचे पार्किंग मध्ये लॉक करून, पार्क करून आपले कर्तव्यावर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची अॅक्टीवा चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस ठाणे पाचपावली चे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन आरोपी क. १) मोहम्मद जाबीर उर्फ ईमरान वल्द अहमद शहा वय २० वर्षे, रा. विराग अली चौक, टेका नविन वस्ती, पाचपावली, नागपूर २) मोहम्मद बबलू वल्द मोहम्मद शगौर वय २० वर्षे, रा. टेकानाका, फारूख नगर, सज्जुभाई पानठेलेवाले यांचे घरी किरायाने, पाचपावली, नागपूर हे नमुद वाहन घेवुन जातांना समक्ष मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळील वाहनाबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपींना ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली असता, वर नमुद वाहन चोरीचा गुन्हा केल्याची आणि आरोपी क. १ याने पोलीस ठाणे तहसिल येथून सन २०२३ साली एक मोपेड गाडी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचा अभिलेख तपासला असता आरोपी क. १ हा पोलीस ठाणे आष्टी जि. वर्धा येथील वाहन चोरीच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता एक गंजलेली लोखंडी टोकदार गुप्ती किंमत ५५०/-रू. ची मिळुन आल्याने जप्त करण्यात आली. आरोपींना गुन्हयात अटक करून त्यांचे ताब्यातुन पोलीस ठाणे पाचपावली येथील वाहन चोरीचे गुन्हयातील ०१ अॅक्टीव्हा व तहसिल येथील वाहन चोरीचे गुन्हयातील विना नंबर प्लेटची चोरी केलेले दुचाकी असे एकुण ०२ दुचाकी वाहने व एक लोखंडी गुप्ती असा एकुण किंमती अंदाजे ३०,५५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरूध्द गुन्हयात कलम वाढ करून कलम ३०२(२), ३(५), सहकलम ४/२५ भा.ह. का, सहकलम १३५ म.पो.का अन्वये दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) नागपूर शहर, महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), श्वेता खाडे, सहा. पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली वयोनि, बाबुराव राऊत, दुपोनि, हरेश कळसेकर, पोउपनि, रंजीत मांजगावकर, पोहवा, लक्ष्मण शेंडे, किशोर गरवारे, सुरेन्द्र तायडे, पोअं. पकज डबरे, राजेशकुमार सिंग व प्रशांत कोसारे यांनी केली.