एकनाथांच्या परीक्षेचा काळ आणि सभोवतलचे खट्याळ 

आजची हि आणीबाणीची वेळ कोणी कोणावर आणली त्यावर नेमके उत्तर तेही लोकसभा निवडणूक निकाल लागण्यापूर्वी सांगणे कठीण आहे पण गढूळ राजकीय जे वातावरण या राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे ज्या पद्धतीने शिवसेना आधी दुभंगली त्यानंतर खंगली आहे त्यात नेमकी चूक एकनाथांच्या नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या हुकूमशहा आणि हिशोबी वृत्तीतून ओढवलेली आहे हे नक्की. बाहेर पडलेल्या एकनाथांची आजची शिवसेना कि उद्धव यांच्याविषयी वाढलेली सहानुभूती हेही तुम्हाला नेमके निकाल बाहेर आल्यानंतर कळणार आहे त्यात महत्वाची बाब अशी कि इतरांचे जाऊ द्या पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवन मरणाची वेळ ठरविणारी हि लोकसभा निवडणूक आहे, विशेषतः एकनाथ शिंदे यांनी आपणहून ओढवून घेतलेली आफत नक्कीच साऱ्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे, म्हणजे तब्बल 15 ठिकाणी उमेदवार उभे करून एकनाथ यांनी आपणहून पायावर कुर्हाड मारून घेतलेली आहे कि ज्यापद्धतीने अचूक निर्णय घेत आजतागायत एकनाथांनी जशा अनेक राजकीय लढाया तेही आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर जिंकल्या आहेत, नेमके या लोकसभेला देखील तेच घडणार आहे कि एकनाथांचे न भूतो न भविष्यती पद्धतीने राजकीय नुकसान होणार आहे, आजचे नेमके उत्तर ते राजकीय जीवनातून उध्वस्त होतील हे जरी असले तरी स्वतःचे मोठे राजकीय नुकसान ओढवून घेणाऱ्यातले एकनाथ हे सेनेतले ‘ उद्धव ‘ नक्कीच नाहीत, त्यांचा स्वतःवर असलेला विश्वास आणि नेमका राजकीय अंदाज त्यांना त्यांचे मन नक्की जिंकू हेच सांगत असेल….म्हणून एकनाथ यांनी भाजपाकडून थेट 15 जागी उमेदवारी मागून घेतली, तुमच्याही ते लक्षात आलेच असेल कि एकनाथ यांच्या उमेदवारांची हि लढाई हि निवडणूक महाआघाडी विरुद्ध महायुती अशी अजिबात नसून ती उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच आहे…

सर्वाधिक महत्वाची बाब अशी कि फारतर एखादा दुसरा अपवाद वगळता एकनाथ शिंदे यांनी दिलेले उमेदवार अगदीच कच्चे लिंबू असून किंवा कमालीचे बदनाम झालेले उमेदवार असेही म्हटल्यास वावगे ठरू नये, त्याचवेळी उद्धव यांनी कोणतीही रिस्क न घेता दिलेले तुल्यबळ ताकदवान शक्तिमान उमेदवार माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे निकालांचे राजकीय गणित नक्कीच एकतर्फी वाटते पण शिंदे म्हणजे बेसावध राहून कोणताही कुठलाही निर्णय घेणारे नेते नाहीत, मी त्यांना ठाण्याच्या स्थानिक निर्णयापासून तर थेट मुख्यमंत्री होतांना किंवा मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय जवळून बघत आलोय….शिंदे केवळ दिसतात भोळे पण त्यांच्यासारखा चाणाक्ष चतुर सावध नेता क्वचित आढळतो, म्हणून उमेदवार कच्चे लिंबू किंवा लिंबू तिंबू आहेत हे आपल्याला वाटते जे शिंदे यांना नक्कीच वाटत नसावे त्यातून त्यांनी थेट 15 जागांवर मनासारखे मनातले उमेदवार दिले आहेत. शिंदे विरुद्ध उद्धव या अटीतटीच्या लढाईत स्वतः शिंदे वगळता राज्यातल्या प्रत्येकाला शिंदे यांचे फारतर दोन उमेदवार निवडून येतील, सट्टा देखील त्याच पद्धतीने म्हणे खेळल्या जातो आहे पण तिकडे शिंदे शंभर टक्के निश्चिन्त आहेत बिनधास्त आहेत आणि इकडे जो तो म्हणतोय सांगतोय कि मतदारांची सिम्पथी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आहे. शिंदे यांना नासमज ठरवून मोकळे व्हावे कि अजित पवारांचे कौतुक करून मोकळे व्हावे हेच नेमके कळत नाही, माझी अवस्था पहिल्यांदाच मधुचंद्र साजरा करण्या पलंगावर झेप घेणाऱ्या नवख्या तरुणासारखी झालेली आहे, असेही वाटत राहते कि अजित पवारांनी योग्य पाऊल उचलले, जे चार मिळाले त्यात समाधान मानले….

माझा राजकीय अंदाज आणि अभ्यास नेमके हेच सांगतो कि मुंबईत रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव तर ठाण्यात नरेश म्हस्के यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी या तिन्ही जागा भाजपाला सोडणे अत्यावश्यक होते…विशेषतः नरेश म्हस्के ऐवजी जर संजीव गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा शिंदे यांनी दाखविला असता तर त्यांना भविष्यात त्यातून मोठे राजकीय फायदे झाले असते, त्यांच्यात आणि गणेश नाईकांत अनेक वर्षांपासून असलेले राजकीय वैमनस्य संपले असते याशिवाय श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य वाढविण्यात नाईकांची मोठी मदत झाली असती, तिकडे राहुल नार्वेकर का कोण जाणे पण अमित शाह यांच्या अलीकडे अगदीच नजरेतून पडले असून त्याठिकाणी मंगलप्रभात लोढा अगदी सहज निवडून आले असते त्यांनी तशी निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी केली होती, गाठीभेटी घेणे देखील सुरु केले होते, कधी नव्हे ते खिशात हात घालायला पण सुरुवात केली होती….याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना आपणहून रान मोकळे का करून दिले कि त्यांना यामिनी जाधव निवडून येतील असा विश्वास आहे, हे अर्थात लोकसभा निकाल लागल्यानंतरच कळेल. महत्वाचे असे कि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असावी का ज्यामुळे त्यांनी पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी शिंदे यांच्यासाठी मन उदार केले, त्यांना खुबीने बेवकूफ बनविले, कधी कधी तर हाच विचार मनात येतो कि उद्धव यांचे उमेदवार अगदी सहज निवडून यावेत म्हणून एकनाथ यांनी थेट 13 जागांवर एखादा अपवाद वगळता कच्चे लिंबू उभे केले असावेत, राजकारणात काहीही घडू शकते…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकारांच्या वार्षिकोत्सवात गुणवंतांचा सत्कार, मेळावा

Fri May 3 , 2024
नागपूर :- राज्य सरकारचे माहिती आयुक्तालय आणि पत्रकारांच्या संघटना यांच्या संयुक्त वतीने लवकरच पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा नागपूरचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केली आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांच्या वार्षिक स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.‌ गेल्या वर्षात पुरस्कार-पदे मिळवणारे पत्रकार आणि परीक्षांमध्ये चांगले यश मिळविणारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com