प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- फिर्यादी नामे अभिषेक नत्युजी सपाट, वय ३७ वर्षे, रा. गौतम सोसायटी, प्लॉट नं. ३९, बुट्टीबोरी, जि. नागपूर हे त्यांचे पत्सर दुचाकी क. एम.एच. ३१ वि.एक्स. ०७८० ने सोबत नातेवाईक नामे अंजना मुरलीधर पिंपळकर, वय ७४ वर्षे, रा. प्लॉट नं. ११५. उमरेड रोड, रामकृष्ण नगर, दिघोरी, नागपुर यांचे सह बनाडोंगरी येथे जात असता, पोलीस ठाणे अजनी हद्दीत शताब्दी चौक ते नरेंद्र नगर चौक दरम्यान सार्वजनिक रोडवर एक अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व धोकादायकरित्या चालवून फिर्यादीने दुचाकी गाडीला धडक दिल्याने, गाडीवरील दोघेही खाली पडुन गंभीर जखमी झाले, जखमी यांना लोकांनी उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता, उपचारादरम्यान श्रीमती अंजना पिंपळकर यांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले, फिर्यादी यांना किरकोळ मार असल्याने उपचार सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे पोउपनि, सुशांत उपाध्ये यांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरूध्द कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं., सहकलम १३४, १७७, १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, ०३ गुन्हे उघडकीस

Fri Mar 7 , 2025
नागपूर :- फिर्यादी राहुल अरविंद मेंढे, वय ३२ वर्षे, रा. अशोक नगर, सिंधी कॉलोनी, प्लॉट नं. २८८, जब्बार हॉटेल जवळ, पाचपावली, नागपूर हे राऊत हॉस्पीटल इंदोरा चौक, पाचपावली, नागपूर येथे फिजीओथेरेपीस्ट म्हणून डॉक्टर आहेत. दिनांक २३.१२.२०२४ चे २३.०० ते दि. २४.१२.२०२४ थे ०७.०० वा. चे दरम्यान फिर्यादी हे त्यांची पाढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा आय गाडी क. एम.एच. ४९ ए.एफ. ३७१५ किंमती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!