‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा, मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. रविवार, दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR

राज्यातील गोरगरिब जनतेला दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी शासनाच्या वतीने 100 रुपयात शिधा जिन्नस ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ कशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत प्रगतीपथावर असलेली कामे आणि सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील विकास कामे, या जिल्ह्यांमध्ये आरोग्य विषयक राबविण्यात येणाऱ्या योजना, पर्यटनाच्या दृष्टीने घेण्यात आलेले निर्णय याबाबत सविस्तर माहिती मंत्री  चव्हाण यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com