अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पदव्यूत्तर गणित विभागात राष्ट्रीय गणित दिवसाच्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरीय पोस्टर, सेमिनार आणि गणितीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदी डॉ. पी. ए. वाडेगावकर प्र. कुलगुरू , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे प्रा. के. एस. अढाव, माजी गणित विभाग प्रमुख , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि प्रा. व्ही. बी. राऊत, प्राचार्य मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा तसेच प्रा. एस. एस. शेरेकर गणित विभाग प्रमुख हे उपस्थित होते.
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच पुष्प-सुमनांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस. एस. शेरेकर यांनी केली. याप्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. के. एस. अढाव यांनी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील योगदान सांगितले. तसेच प्रा. व्ही. बी. राऊत यांनी गणिताचे समाजात किती महत्वाचे स्थान आहे हे सांगितले तसेच गणिताचा अभ्यास करताना समर्पण हे खूप महत्वाचे आहे हा महत्वाचा सल्ला दिला. तसेच डॉ पी. ए. वाडेगावकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गणित विषयात संशोधनाचे महत्व व इतर विषयातील गणिताचे स्थान अधोरेखित केले.
उदघाटन कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी पोस्टर, सेमिनार आणि रांगोळी यांचे परीक्षण केले. या प्रसंगी डॉ. पी. आर. अग्रवाल, एच. जि. परळीकर, एम. सी. धाबे हे परीक्षक म्हणून लाभले. पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आचल शरद जगताप, द्वितीय क्रमांक देवेंद्र वसंत चव्हाण याने तर तृतीय क्रमांक सोनल एकनाथ मांडवकर हिने मिळवला. तसेच सेमिनार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कपिल विनय निळे, द्वितीय क्रमांक अकिब रजा मोहम्मद अबिद याने तर तृतीय क्रमांक वैष्णवी सुरेश मोरे व समीक्षा राजेश दुधे ह्यांनी मिळवला. गणितीय रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी गोवर्धन मोहोड, द्वितीय क्रमांक रिया शैलेंद्र ठाकरे हिने तर तृतीय क्रमांक भाग्यश्री हरिदास बदरखे हिने मिळवला.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षपदी प्रा. एस. एस. शेरेकर गणित विभाग , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. एस. एन. बायस्कर, आदर्श महाविद्यालय धामणगाव, एम. सी. धाबे हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता डॉ. एम. एस. देसले, ए. आय. देठे, ए. पी. निळे, डी. पी. राठोड, के. पी. काळे, बी. डी. देशमुख, ए. एस. रौंदळे, शोएब अख्तर या सर्व शिक्षकवृंद व विभाग प्रमुखांचे अनमोल मार्गदर्शम मिळाले. कार्यक्रमाचे संचालन अश्विनी भगत व वैष्णवी गव्हाड यांनी केले. विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. प्रमोद येवले यांनी विद्यार्थ्याना सुभेच्छा दिल्या.