कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १४.०७.२०१२ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कोराडी हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे प्रविण गजानन रंगारी, वय ३८ वर्षे, सिध्दार्थ नगर, महादुला, पो.स्टे. कोराडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक १४.०७.२०२२ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. १४.०७,२०२२ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

प्रविण गजानन रंगारी यांचेविरूध्द पोलीस ठाणे कोराडी येथे आपखुशीने गंभीर दुखापत करणे, प्राणघातकः शस्त्राने दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अवैधरित्या दारू विकी करणे, दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धमकी देणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे व हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत…

सदर स्थानबध्द इसमाला गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी कोराडी पोलीसांकडून सन २०२० मध्ये दोन वेळा ११० सी.आर.पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२१ मध्ये ९३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरीपण त्याने बंधपत्राचे उल्लंघन करून गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने पोलीस उप आयुक्त, परि . ५ नागपूर शहर यांनी त्यास सहा महिन्याकरिता हदपार केले होते. अलीकडील काळात प्रस्था. इसमाने पो. ठाणे कोराडी हददीत प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धमकी देणे, अवैधरित्या दारू विकी करणे, मनाई आदेशाचे व हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत,

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे प्रविण गजानन रंगारी यांची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे कोराडी, नागपूर शहर त्यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए.. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरुद स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणारा आरोपी अटकेत

Sat Jul 15 , 2023
नागपूर :- पो. ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ३० एन. आय. टी गार्डन मागे, प्रियदर्शनी नगर येथे राहणारे फिर्यादी रामसुरज रमापती विश्वकर्मा वय २६ वर्ष यांनी त्यांची दुचाकी वाहन लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता. गुन्हयाचे संमातर तपासात गुन्हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com