संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2 ऑगस्ट : – कामठी तालुक्यातील गुमथळा येथे विदर्भ मराठवाडा प्रकल्प अंतर्गत पशु संवर्धन विभाग पंचायत समिती कामठी द्वारे पशु पालकांना नुकतेच वैरण विषयक प्रशिक्षण देण्यात आले.
पशु पालकांना मेगास्वीट(संकरित ज्वार)जातीचे वैरण बियाणे मोफत वाटप करण्यात आले .या प्रशीशन कार्यक्रमात नागपूर पशु वैद्यक महावीद्यालया चे पशुपोषण व पशु आहार विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. शीतल चोपडे व अडवांटा शिड्स चे टीएसएम रणवीर देशमुख ,नागपूर अध्यात्मिक डेरी फार्मिंग इकवायरमेंट्स चे संदीप ठाकरे,पंचायत समिती सद्यस्य पूनम माळोदे,मदर डेरी गुमथळा केंद्राचे सहायक जगदीश डाफ हजर होते.कार्यक्रमात सहभागी झालेल्या पशुपालकांना व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या ना फायदेशीर दुग्ध उत्पादनासाठी पशूंना हिरवी वैरण व खनिज मिश्रणाचे संतुलित आहारातील महत्व याबाबतीत डॉ. शीतल चोपडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना पशु धन विकास अधिकारी विस्तार डॉ. लीना पाटील यांनी मांडली. संचालन गुमथळा चे पशुधन पर्यवेक्षक प्रदीप येवतकर यांनी तर आभार प्रदर्शन योगिनी खोडे यांनी केले .
पशुपालकांना दिले वैरण विषयक प्रशीक्षण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com