नागपूर :- छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “कहीं हम भूल न जायें” या अभियाना अंतर्गत नागपूर जिल्ह्यात दहा दिवसीय “शाहू मेला ऑन व्हील्स” च्या भव्य आयोजनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम, दीक्षाभूमी, नागपूर वर भव्य विद्यार्थी परिषद 30 जून, 2024 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत संपन्न झाली. या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ॲड. अतुल पाटील तसेच मार्गदर्शक ॲड. रितेश पाटील, ॲडवोकेट ऑन रेकॉर्ड, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, दिल्ली व ॲड. अश्विनी मून होते.
या परिषदेत सम्यक वाहाने, सम्यक मेंढे, राशी खंडारे, दिक्षांत साखरे, सायुरी रंगारी, सम्यक नाखले, संबोधी उके, तनिष्क वानखेडे, आर्यवंश खंडारे, करुणा सोनुले, दर्शील पाटील, हर्ष रत्नपारखी, सृष्टी पराते, अंशुल ब्राह्मणे, सौम्या गाडगे, सोहील शींगाळे, आरोषी वानखेडे, निवांत गजभीये, पायल मेश्राम, आस्था गजभिये, अंशिका कांबळे, सिद्धांत मेश्राम, गारगी मेश्राम, मेघना पराते, केशवी शींगाडे, असीत फुले, मुदीता बोदलकर, स्मिथ मून, पल्लवी बारसागडे, ख्रिस्ती साखरे, आयुषी लोखंडे, संबोधी सोमकुवर, विराज मेश्राम, अक्षरा कांबळे, सानवी बगळे, गारगी डोंगरे, कोमल धावर्डे, अत्वेद गजभिये, आषिता नळे, मानस पाटील, रजत मेश्राम, विदिशा बोदलकर, तन्मय वानखेडे, नंदीनी मेश्राम, निर्वाण मून आदि तिसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध माहापुरुषांवर वक्तव्य मांडले.
या विद्यार्थी परिषदेचे सुत्र संचालन संबोधी चवरे, अवनी बोरकर, विराज रत्नपारखी व निर्मित काळे यांनी केले. तसेच प्रस्तावना नमो नळे हीने मांडली व आभार प्रदर्शन आयुषी लोखंडे ने केले. या विद्यार्थी परिषदेत जवळ पास 550 लोकांनी उपस्थिती नोंदविली.