माजी आमदाराच्या नातेवाईकांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात नविन कामठी पोलिसांना अजूनही अपयश

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– शुभम नगरच्या कुलूपबंद घरातून 8 लक्ष 40 हजार रुपयांची झाली होती घरफोडी

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा येथील माजी आमदार देवराव रडके यांच्या नातेवाईक रहिवासी असलेले शुभम नगर मधील कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने मुख्य दाराचा कुलुपकोंडा तोडुन घरात अवैधरित्या प्रवेश करून बेडरूम मध्ये सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने,नगदी 5 हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण 8 लक्ष 40 हजार रूपयाची घरफोडी केल्याची घटना 21 डिसेंबर 2023 मध्ये घडली होती असून यासंदर्भात फिर्यादी ललित रडके ने पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला होता.आज या घटनेला घडून तीन महिने लोटून गेले मात्र पोलिसांना या चोरीचा पर्दाफाश करण्यात अपयश आल्याने अपेक्षित असलेल्या रडके कुटुंबियात पोलिसाविषयी नाराजगीचा सूर वाहत आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर फिर्यादी व त्याचा मोठा भाऊ चंद्रपूरला भावाकडे असलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले असता चोरट्याने घरी कुणी नसल्याचे संधी साधून घरातील सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने,मोबाईल आदी साहित्य असा एकूण 8 लक्ष 40 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 21 डिसेंबर 2023 ला घरी परातल्यावर निदर्शनास येताच त्वरित नविन कामठी पोलीस स्टेशन ला धाव घेतली.पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल तपासाला गती दिली मात्र चोरट्यांचा शोध लावण्यात अजूनही पोलिसांना यश मिळत नाही याची शोकांतिका आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी आमदार देवराव रडके यांनी केली आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नुकत्याच 19 एप्रिल ला संपन्न झालेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.मात्र आता लोकसभा निवडणूक संपन्न झाली असून आदर्श आचारसंहितेच्या नावावर प्रशासकीय अडचणीचे कारण दर्शवित विविध कामांना थांबा देण्यात आल्याने विविध विकास कामे रखडले आहेत.तेव्हा रखडलेली विकास कामे लक्षात घेता नागरिकांच्या हितार्थ लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करावी अशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com