संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच 19 एप्रिल ला संपन्न झालेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.मात्र आता लोकसभा निवडणूक संपन्न झाली असून आदर्श आचारसंहितेच्या नावावर प्रशासकीय अडचणीचे कारण दर्शवित विविध कामांना थांबा देण्यात आल्याने विविध विकास कामे रखडले आहेत.तेव्हा रखडलेली विकास कामे लक्षात घेता नागरिकांच्या हितार्थ लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी माजी आमदार देवराव रडके यांनी केले आहे.
कामठी तालुक्यात उष्णतेचा जोर वाढला असून उन्हाच्या झळा वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी व चारा टंचाई चा सामना करावा लागत आहे. शेतीकामातील खरीप पिकाचे नियोजन झाले असून अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीकामाच्या भावना लक्षात घेता व नागरिकांचे हित जोपासून कामठी तालुक्यात लागू असलेले आदर्श आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी माजी आमदार देवराव रडके यांनी केले आहे.