नागपूर :- म.न.पा. प्रवर्तन विभाग मार्फत दिनांक ११.०१. २०२४ रोजी मंगळवारी झोन क्र.१० अंतर्गत प्रमोद सोनटक्के प्लॉट क्र B/279 मार्टिन नगर रिंग रोड जरीपटका नागपूर येथील अनधिकृत बांधकामाची कारवाई करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अंतर्गत दिनांक 22.8.2023 रोजी झोन द्वारा नोटीस तामील करण्यात आली होती. तर आज अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात आले ज्यामध्ये यांनी अनधिकृत पद्धतीने बनवलेले बांधकाम पूर्णपणे हटविण्यात आला यांचे एकूण अनधिकृत बांधकाम 129.60 m2 क्षेत्रांमध्ये होते ते पूर्णपणे हटविण्यात आले व परिसर मोकळे करण्यात आला .
• नेहरूनगर झोन क्र. ५ अंतर्गत झोन कार्यालय ते शीतला माता मंदिर ते सक्करधरा तलाव ते छोटा ताजबाग ते सक्करधरा चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 साहित्य जप्त करण्यात आला व परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आले.
• धरमपेठ झोन क्र. २ अंतर्गत झोन कार्यालय ते सिताबर्डी मेन मार्केट ते यशवंत स्टेडियम ते मुंजे चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले होकर्स यांचे ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 03 ठेले जप्त करण्यात आले व परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आले.
• ही कारवाई हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात भास्कर माळवे, विनोद कोकर्दे क. अभियंता, व अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.