संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान हॉकर्स युनियन कृती समितीच्या अन्या यग्रस्थ दुकानदारांचा नगरपरिषदेवर मोर्चा
कन्हान :- पुराच्या पाण्याचा निचरा करण्याच्या नावा खाली नाला सफाई करण्याचे कारणाने राष्ट्रीय महामा र्ग क्र ४४ वरील आनंद रेस्टॉरंट ते इंडियन होम पाईप कंपनी गेट पर्यंतच्या दुकानदारांच्या मागील ग्रोमोर व्हेंचर्स ग्रुपच्या ले-आऊट धारकाच्या लाभाकरिता शा सन, प्रशासनाच्या अधिका-यांनी एकेरी अतिक्रमण हटवुन फक्त ८० दुकानावर बुलडोजर चालवुन दुकान दारांना बेरोजगार केल्याने कन्हान हॉकर्स युनियनकृती समितीच्या अन्यायग्रस्थ दुकानदारानी आंबेडकर चौक ते नगरपरिषद पर्यंत मोर्चा काढुन सर्व दुकानदारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या आणि भविष्या बाब त अत्यंत निराशेचे वातावरण निर्माण झाल्याने सर्व दुकानदारांचे त्वरित पुनर्वशन करावे. अन्यथा सर्व दुकानदाराना सामुहिक आत्महत्या करण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मुख्याधिकारी हयाना निवेदन दे़ऊन त्वरित पुनर्वशन करण्याची मागणी केली आहे.
कन्हान नगरपरिषदेने (दि.४) जानेवारी २०२५ ला पुराच्या पाण्याचा निचरा करण्याच्या नावाखाली नाल्याची सफाई करण्याचे कारण दर्शवुन राष्ट्रीय महा मार्ग क्र ४४ वरील आनंद रेस्टॉरंट ते इंडियन नॅशनल होम पाईप कंपनी गेट पर्यंत च्या दुकानदारांच्या मागे असलेल्या ग्रोमोर व्हेंचर्स ग्रुपच्या ले-आऊट धारकाच्या फायद्यासाठी शासन, प्रशासनाच्या अधिका-यांनी पदा चा गैरवापर करित षडयंत्र रचुन गेल्या तीस ते चाळीस वर्षापासुन दुकाने लावुन स्वयं रोजगार करित स्वत: च्या परिवारांचे उदरनिर्वाह करणा-या दुकानदालांच्या दुकानाचे नगरपरिषद मुख्याधिकारी व पीडब्लुडी च्या अधिका-यांनी एकेरी अतिक्रमण हटवुन फक्त ८० दुका नावर बुलडोजर चालवुन दुकानदारांना बेरोजगार केले. परंतु त्याच तोडलेल्या दुकानाच्या जागेवर ले-आउट धारक समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे लोक जमवुन दुकानदारांना धमकावत आहेत. दुकानांच्या जागेवर डेब्रिज, गिट्टी टाकुन अतिक्रमण करित आहे. हे शासन, प्रशासनाचे अधिकारी उघडया डोळयानी बघत आहे का ? अश्या सर्व प्रकारामुळे पीडित दुकानदार मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यानी अंत्यत त्रस्त झाले आहेत. सर्व दुकानदारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वा हाची समस्या आणि भविष्या बाबत अत्यंत निराशेचे वातावरण निर्माण झाले असुन बहुतांश दुकानदार हे दलित, महार समाजाचे असल्याने सर्व दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करावे, दिवसेंदिवस दैनंदिन जीवन कठीण होत चालले आहे जर या समस्येवर योग्य तोडगा निघाला नाही तर दुकानदाराना सामुहिक आत्महत्या करण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
(दि.१०) जानेवारी २०२५ रोजी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचे प्रथम आगमन होताच नगरपरिषद कार्यालयात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासकीय अधिका-यांना देण्यात आले. तसेच (दि.१७) जानेवारी ला रामटेक विधानसभा आमदार व राज्यमंत्री आशिष जैस्वाल व खासदार शामकुमार बर्वे हयांनी नगरपरिषद कार्यालय कन्हान येथे संयुक्त बैठक घेऊन दुकानदारांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज पर्यंत कोणतेही सार्थक प्रयत्न झालेले दिसत नसल्याने अन्यायग्रस्तांना न्याय मिळवुन देण्यासाठी, पुनर्वशनाकरून रोजगार पूर्ववत करण्यास सहकार्य व मदत करण्याची मागणी कन्हान हॉकर्स युनियन कन्हान कृती समितीच्या अन्या यग्रस्त दुकानदारानी डॉ आंबेडकर चौक कन्हान येथि ल डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नगरपरिषद कन्हान-पिपरी पर्यंत मोर्चा काढुन मुख्याधिकारी दिपक घोडके आणि कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील हयाना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी संबधित लोकप्रतिनिधी व शासन, प्रशासनाच्या अधिका-यांना माहितीस व योग्य कार्यवाहीस अग्रेसर करण्यात आले आहे.
याप्रसंगी उदयसिग यादव महामंत्री भाजपा नागपुर जिल्हा (ग्रामीण) यानी भेंट देऊन समर्थन जाहिर केले. माजी उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, माजी नगरसेवक राजेश यादव, मनिष भिवगडे , दुकानदार चिराल वैध, प्रशांत पाटिल, प्रकाश सिंह, परमसिंह, नावेद आलम, अमोल मोहबे, सरोज बुदेलि या, इंदिरा वाल्दे, अनिता वाघमारे, वनिता बुदेलिया, अनिल, राहुल वानखेड़े, राजेश वानखेड़े, पंजाब, अनिल, महेश धोगडे, बंटी हेटे, सचिन चकोले, सुभाष चंद्र अहिरवार, राजा अहिरवार, दिगांबर हारगुडे, नितिन मेश्राम, अजय सह समस्थ अन्याग्रस्थ दूकान दार प्रामुख्याने उपस्थित होते.