नागपूर :- नागपूर शहर आदीवासी काँग्रेसच्या वतीने दि. 5 फेब्रुवारी रोजी नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांना 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत EVM मशिन ऐवजी बँलेट पेपरने मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी. याबाबत निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शहर अध्यक्ष प्रदीप मसराम, जिल्हा अध्यक्ष दशरथ मसराम, काटोल तालुका अध्यक्ष मनोहर कौरती, कामठी तालुका अध्यक्ष प्रमोद मडावी, शहर उपाध्यक्ष अनिल मरसकोलहे, गोपाल कुडमेथे, विनोद परतेकी, कुसुम ठाकुर, रकृष्णराव उईके, रवी सिडाम, शांताराम मडावी, प्रेम पुरके, भिकराज कुमरे, सुनील पडोळे व इतरही आदीवासी बांधव उपस्थीत होते.