वनिता बेले- मेश्राम यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथे अंशकालीन अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या वनिता यादवराव बेले (वनिता राष्ट्रपाल मेश्राम) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्यविज्ञान शाखेअंतर्गत अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. वनिता बेले यांनी पी.डब्ल्यू.एस. कॉलेज नागपूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रज्ञा बागडे यांच्या मार्गदर्शनात संशोधनकार्य पूर्ण केले. ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांचे आर्थिक अध्ययन (नागपूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भात कालखंड २००६ ते २०१६ )’ हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता.  वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर या संशोधन केंद्रातून त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रज्ञा बागडे, संशोधन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. मनोहर कुंभारे, आयएएस केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ. प्रमोद लाखे, प्रा. डॉ. अद्विती देशमुख, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, प्रा. किरण नागपुरे, प्रा. कुंदा काळबांडे, प्रा.  बोरसे यांनी अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Woman Robot Astronaut "Vyommitra" will fly into Space ahead of ISRO's ambitious “Gaganyaan" mission, which will be India’s first human manned Space Flight carrying Indian Astronauts into Space

Tue Feb 6 , 2024
– While the uncrewed Robot Flight “Vyommitra” will take place this year, “Gaganyaan” will be launched next year New Delhi :- Woman Robot Astronaut “Vyommitra” will fly into Space ahead of ISRO’s ambitious “Gaganyaan” mission, which will be India’s first human manned Space Flight carrying Indian Astronauts into Space. Disclosing this in New Delhi during an interaction with media, Union […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com