– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण की कारवाई
नागपुर :- ग्रामिण जिल्हयात मोटरसायकल चोरांच्या घटना वाढत असल्याने त्यावर आळा घालण्या करीता मा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांनी त्याकरीता विशेष पथक स्थापन केले. दिनांक ०३/१०/२०२३ रोजी सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गुप्त बातमीदारांकडून तीन संशयित इसमा बद्दल महिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तीन संशयित इसम नामे १) अमन बीसनदेव सहानी, वय २१ वर्ष, २) युनूस सिराज खान, वय २० वर्ष, ३) दीपक रामबच्चन गोसावी वय २४ वर्ष तिन्ही रा. खदान नं. ६ कन्हान यांना ताब्यात घेतले. त्यांनी विचारपुस दरम्यान सदर मोटरसायकलींची चोरी हो मौजमस्ती करीता पैशांची आवश्यकता असल्याने केल्याचे सांगीतले. त्यांचे ताब्यातून चोरी केलेली एक काळ्या रंगाची हिरो होंडा स्पेलडर मो. सा. क्र. MH 40AJ 2207 किंमती अंदाजे ५०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन कन्हान येथील अप. क्र. ६३९ / २३ कलम ३७९ भा.द.वि. मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. नमूद आरोपीतांना वैद्यकिय तपासणी करुन मुद्देमाल व कागदपत्रासह पोलीस ठाणे कन्हाण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बलाल पांडे, सहायक फौजदार नाना राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, ईकवाल शेख, प्रमोद भोयर, पोलीस नायक संजय बडोदीया, चालक पोलीस हवालदार शुक्ला यांनी पार पाडली.