१५ ते २५ जानेवारी दरम्यान गोवर लसीकरण विशेष मोहिम

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर : राज्यातील काही भागात गोवर (मिझल्स) ची साथ पसरत असल्याने गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाअंतर्गत गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा १५ ते २५ डिसेंबर २०२२ दरम्यान राबविण्यात आला असून दुसऱ्या टप्पात १५ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी गुरूवारी (ता.५) टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणा-या नियमित लसीकरणासंदर्भात व मिझल्स रुबेला लसीकरण मोहिम टास्क फोर्स समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात गुरूवारी (ता. ५) पार पडली. बैठकीत मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, डॉ. सरला लाड, डॉ. वैभवी गभणे, डॉ. अश्विनी वाघ, डॉ. भाग्यश्री गावंडे, डॉ. प्रिया धनारे, डॉ. अनुपमा मावळे, डॉ. विजय कुमार तिवारी, डॉ. सुनिल कांबळे, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. मीनाक्षी माने, डॉ. मेघा जैतवार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला.

डॉ. मोहम्मद साजीद पुढे म्हणाले की, राज्यातील काही भागात गोवरचे रुग्ण वाढत असले तरी नागपुरात मात्र परिस्थिती आटोक्यात आहे. असे असले तरी ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही त्यांना गोवरची लस देण्यात यावी, याकरिता ही विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा १५ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात आला. तर दुसरा टप्पा १५ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन १० जानेवारीपर्यंत पूर्ण करून, प्रत्यक्ष मोहिम १५ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश बैठकीत उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात, खासगी रुग्णालयातील लसीकरणाचाही आढावा घ्यावा, परिसरातील खासगी शाळांमध्ये जाऊन तेथील बालकांच्या पालकांची भेट घेऊन लसीकरणाचे महत्व सांगावे अशा सूचना डॉ. साजीद यांनी केल्या. गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्यात व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. पुढील डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर आणि रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचा मानस यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी देण्यात आली असली तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस द्यावी. यासाठी आरोग्य सेविका, आशा वर्कर तसेच प्राथमिक उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा तसेच व्यापक लसीकरण मोहिमेस यशस्वी करण्यासाठी धर्मदाय रुग्णालयांचीही मदत घ्यावी, असे आवाहन टास्क फोर्स समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“IGNOU’s Outreach Efforts towards Inclusive Education”

Sat Jan 7 , 2023
Nagpur :-Dr. P. Sivaswaroop, Senior Regional Director of IGNOU Nagpur Regional Centre in a Press Meet, said that Indira Gandhi National Open University (IGNOU) offers courses in several fields as per needs of various sections of the society. It also upgrades earlier programmes and offer higher level programmes. At present for January 2023 admission session IGNOU is offering 249 programmes […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com