विज बिल माफ झालेच नाही, त्रास मात्र वाढला.

कोदामेंढी :- अरोली-कोदामेंढी जि.प.क्षेत्र व कोदामेंढी पं.स.क्षेत्र परिसरातील तांडा गट ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या श्रीखंडा येथिल शंभर टक्के शेतकऱ्यांनी व साठ टक्के गावकऱ्यांनी विज बिल माफ होणार आहे म्हणून विज बिल भरनेंच बंद केले आहे.मागिल एक महीण्यापूर्विपासून शेतात विजेचे खांब पडून आहेत,ताराही लोंबकाळत आहेत. गावातही पोल वाकले असून तारा लोंबकाळत आहेत.विज बिल भरल्यानंतर विजेच्या समस्या सोडविल्या जाईल असे अरोली वितरण कंपनीचे लाईनमेन जत्रे शेतकरी व गावकऱ्यांना सांगत असल्याचे शेतकरी व गावकऱ्यांनी सांगितले.विज बिल माफ झालेच नाही,त्रास मात्र वाढला अशी म्हणण्याची वेळ श्रीखंडावासीयांवर आली आहे.

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण 

Sun Jun 4 , 2023
– शिस्तपालन करणाऱ्या वाहनचालकांना मिळणार ३५ कोटींची बक्षिसे नागपूर :- वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्त्वाचे असतात, याच नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचा एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप आहे. नागरिकासाठी ॲपद्वारे ३५ कोटी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com